नालासोपाऱ्यात नायजेरियन युवकाची किरकोळ वादातून हत्या

निर्घृण हत्या
File Photo

नालासोपारा (महाराष्ट्र उपसंपादक सुनिल तांबूसकर) । शहरात मोठ्या प्रमाणात नायजेरियन नागरिक राहत असून, प्रगतीनगर भागात त्यांची सर्वाधिक संख्या आहे. क्षुल्लक वादातून एका नायजेरियन नागरिकाच्या डोक्यात काचेची बाटली फोडून हत्या करण्यात आली आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.

हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव लकी इकेचकव उईजे (32)असे आहे. शनिवारी मध्यरात्री प्रगतीनगरच्या रोशन अपार्टमेंट येथील मोनू किराणा दुकाना जवळ तीन नायजेरियन बातचीत करत उभे होते. त्यावेळी त्यांच्या परिचयाचा लकी इकेचकव उईजे (32) हा तिथे आला. काही वेळात त्यांच्यात क्षुल्लक बाबीवरून मोठा वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यावसान मारामारीत झाले. यावेळी दोघांनी लकी याच्या डोक्यात काचेची बाटली फोडून त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी तुळींज पोलिसांनी तीन नायजेरियन नागरिकांविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 103 (2), 3 (5) प्रमाणे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी २ आरोपी नायजेरियन नागरिकांना अटक केली असून तर एक आरोपी फरार झाला आहे.पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अयूला बाबाजिदे बार्थलोम (50), ओघेने इगेरे (47) यांना अटक करण्यात आली असून ओडिया इझू पेक्यूलिअर (50) हा फरार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here