चिखली शहरात एटीएम फोडून १० लाखांची रोकड लंपास

एटीएम

बुलडाणा (जिल्हा क्राईम रिपोर्टर सचिन जगदाळे) । चिखली शहरात मध्यरात्रीच्या सुमारास निमर्नुष्य असलेल्या भागात घडला असून भर वस्तीच्या परिसरात असलेल्या एटीएम मशीनवर चोरट्यानी दरोडा टाकला आहे. रात्रीच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीनचा पत्रा कापून यातील सुमारे १० लाख रुपयांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.

कोणतीही सुरक्षा नसल्याने एटीएम मशिनवर चोरट्यांकडून लक्ष केले जात आहे. मशिनचा पत्रा कापून किंवा त्यातून रोकड लांबवत असतात. तर काही ठिकाणी थेट मशीन उचलून नेले जात असल्याचे प्रकार घडले आहेत. असाच प्रकार बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली शहरात घडला असून मशीनचा पत्रा कापून रोकड लांबविली आहे. पोलीस आता विविध माध्यमातून चोरट्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, चिखली शहरातील राऊतवाडी परिसरातील भरवस्तीत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये घुसून चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून त्यातील दहा लाख रुपयांची रोकड लांबवली आहे. चोरट्यांनी सुमारे दीड तास या एटीएम मध्ये धुमाकूळ घालत गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून रोकड लांबवली. या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. अतिशय दाट वस्तीच्या असलेल्या राऊतवाडी परिसरात अशी घटना घडल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here