
नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) । तीन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे गिरणा नदी काठावरील सर्वच गावांमध्ये पाणी शिरले होते. विशेषतः विठेवाडी भऊर शिवारात शेतांमध्ये प्रचंड पाणी घुसले होते. या शेतांचे महसूल आणि कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेत शिवाराची पहाणी करुन, तात्काळ पंचनामे सुरु झाले आहेत. दरम्यान हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.
दि २७ तारखेला ढगफुटी सद्रुष्य पर्जन्यवृष्टी झाली, आणि प्रचंड वादळीवाऱ्यासह तुफान पाऊस झाला, त्यामुळे नदी काठालगत असलेल्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,नदी काठावरील दहा एकर पेक्षा जास्त मक्याचे पिक पूर्णपणे आडवे झाले आहे, विठेवाडी,शिवारातील मका व इतर पिकाचे नुकसान झाले आहे, अजुनही काही शेता मध्ये पाणी साचले आहे, महसूल, कृषी विभागाने तातडीने पंचनामे सुरू केले आहेत. हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
आज महसूल विभागाने नदी काठावरील नुकसानग्रस्त पिकांची पहाणी केली, कृषी विभागाने ही काल प्रत्यक्ष बांधावर जाऊन सहायक अधिकारी गायकवाड यांनी विठेवाडी येथील नदी काठावरील काही ठिकाणी नुकसानीची पाहणी केली होती, आज तातडीने देवळा तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांच्या सुचनेनुसार विठेवाडीच्या तलाठी जोत्सना कडापे, सहायक जिभाउ गरुड यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीची पहाणी केली.
यावेळी प्रती हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई तात्काळ देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव यांनी शेतकऱ्यांच्या वतीने तहसिलदार मिलिंद कुलकर्णी यांच्याकडे लेखी निवेदनाद्धारे केली आहे.






