सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) । मंगळवेढा पोलीस स्थानकात श्री शक्ती देवी उस्तव मिरवणूक नियोजनाबाबत विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
दरम्यान मंडळाने मिरवणूक करताना शांततेत मिरवणूक पार पाडाव्यात असे आव्हान यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. नवरात्र निमित्त मंगळवेढा शहरात अनेक मंडळांनी श्री शक्ती देवीची प्रतिष्ठापना केली असून दिनांक 2 ऑक्टोबर रोजी नवरात्री सणाचा समारोप होत असून त्या दिवशी सर्व मंडळे शहरातून मिरवणूक काढून कार्यक्रमाची सांगता करणार आहेत.
शहरातील दामाजी चौक शिवप्रेमी चौक चोखामेळा चौक मुरलीधर चौक जुनी बँक ऑफ इंडिया चौक या मार्गावरून पुढे जगदंबा मंदिराजवळ आरती होऊन या मिरवणुका पुढे मार्गस्थ होतात या मिरवणुका प्रसंगी गर्दी होऊ नये यासाठी मंडळाने दोन मिरवणुकीत सुरळीत पार पाडाव्यात व मिरवणुकी दरम्यान फक्त दोन गाणी वाजवणे याबाबत पोलीस प्रशासनाने सहमती दर्शवली आहे
कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरी गिड्डे नायब तहसीलदार शुभांगी जाधव नगरपालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनटक्के नगर रचनाकार तुषार नवले लाईनमन बाबासो जावेरी फोरमन भारत जाधव पोलीस स्टेशन कडे सर्वा अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते दरम्यान यावेळी मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या सर्व मते मिरवणूक पार पाडण्याबाबत सूचना केल्या या बैठकीनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातील मिरवणूक मार्गाची पाहणी केली.







