पंढरपूर शहर पोलिसांची कामगिरी : मोटार सायकल चोरी करणाऱ्या चोरांकडुन पाच मोटार सायकली जप्त

पंढरपूर शहर

पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) । शहरामधtन गणेश विसर्जनादिवशी रोजी दोन मोटार सायकली चोरीस गेल्या होत्या, त्याचा मागोवा घेत पंढरपुर शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे तपास करीत सांगली येथे गेले होते.

त्यानंतर गोपनिय माहिती मिळाली की, आरोपी फिरोज नबीलाल मुल्ला (वय २९ वर्षे) रा. जुळेवाडी ता. तासगाव जि. सांगली , उध्दव प्रताप मिले (वय ५५ वर्षे) रा. तांदुळवाडी ता. माळशिरस जि. सोलापुर यांनी फेब्रुवारी व सप्टेंबरमध्ये एकुण ०४ मोटार सायकली चोरल्या आहेत. त्याअनुषंगाने सदर आरोपीस काल दिनांक २९ सप्टेंबर रोजी ताब्यात घेवुन विश्वासात घेवुन चौकशी केली असता, त्यांनी पंढरपुर शहर पोलीस ठाणे कडील एकुण ०४ गुन्हयाची कबुली दिल्याने येथील ४ गुन्हे उघडकीस आले आहेत. एकाच तपासात चार गुन्हे उघडकीस आल्याने, शहर पोलिसांमध्ये चैतन्य पसरले आहे.
सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, सहा. पोलीस अधिक्षक, प्रशांत डगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्वजीत घोडके पंढरपूर शहर पोलीस ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पोसई राजेश गोसावी, पोह सिरमा गोडसे, विठ्ठल विभुते, प्रसाद औटी, सचिन हेंबाडे, पो. कॉ. कपिल माने, शहाजी मंडले, बजरंग बिचुकले, दिपक नवले, तसेच सायबर पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामीण चे पोकॉ रतन जाधव यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here