पाकिस्तानात जाफर एक्सप्रेसवर पुन्हा हल्ला

जाफर एक्सप्रेस

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) । क्वेटा शहराजवळ जाफर एक्सप्रेसवर पुन्हा बॉम्ब हल्ला झाला असून यामध्ये ७ जण जखमी झाले आहेत. बॉम्ब हल्ल्यामुळे रेल्वे रुळावरुन खाली घसरली. २०२५ मध्ये जाफर एक्सप्रेसवरील हात सातवा हल्ला आहे.

जाफर एक्सप्रेसला सतत लक्ष्य केले जात आहे. क्वेटा ते पेशावरदरम्यान हे हल्ले होत असून मागील काही महिन्यात सात हल्ले झाले आहेत. यापूर्वी ७ ऑगस्ट रोजी सिबी रेल्वे स्थानकाजवळ हल्ला झाला होता, तर त्या आधी ४ ऑगस्ट रोडी कोलपूरजवळ हल्ला झाला होता. या हल्ल्यांची जबाबदारी बलूच लिबरेशन आर्मीने (BLA) घेतली होती.
सद्यस्थितीत आजच्या या हल्ल्याची जबाबदारी बलूच विद्रोही संघटना बलूच रिपब्लिकन गार्ड्सने (BRG) ने स्वीकारली आहे. हा हल्ला झाला त्यावेळी ट्रेन पेशावरकडे रवाना झाली होती. BRG ने जारी केलेल्या निवेदनात सागंण्यात आले की, शिकारपूर-बीरआरजी मार्गाजवळ सुल्तान कोटजवळ जाफर एक्सप्रेसवर हल्ला करण्यात आला. यामध्ये काही लोक जखमी झाले आहे. रेल्वेचे सहा डबे पटरीवरुन घसरले आहेत. BRG ने हेही स्पष्ट केले की, बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत हे हल्ले सुरुच राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here