कल्याणमध्ये मध्यरात्री बारवर पोलिसांची छापेमारी

कल्याण

ठाणे (उपसंपादक प्रकाश कदम) । शहरात रात्रीच्या वेळी सुरू असलेला अवैध धंदा कल्याण झोन तीन पोलिसांच्या कारवाईमुळे चव्हाट्यावर आला आहे. शहरातील अमर पॅलेस या बारमध्ये नियमांचे उल्लंघन करून मध्यरात्री उशिरापर्यंत दारूची विक्री सुरू होती. इतकंच नाही तर येथे येणाऱ्या ग्राहकांसाठी महिला वेटरकडून अश्लील चाळे करवून घेतले जात होते. याची गोपनीय माहिती कल्याण झोन तीनचे डीसीपी आतूल झेंडे यांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास अमर पॅलेस बारवर अचानक छापा मारला. पोलिसांच्या अचानक झालेल्या कारवाईमुळे बारमध्ये उपस्थित असलेल्या ग्राहकांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच पळापळ झाली. याठिकाणी महिला वेटरकडून अश्लील चाळे सुरु असल्याचे निदर्शनास आले होते. पोलिसांनी छापेमारी केल्यानंतर तात्काळ बारमधील कारभार थांबवत काही जणांना ताब्यात घेतले आहे.
कल्याण पोलिसांच्या या धडक कारवाईमध्ये पोलिसांनी बारचा चालक, वेटर आणि एकूण दहा बारबालांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात पोलिसांनी बार चालकासह एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here