ग्रामस्वच्छतेसाठी गोंडगाव ग्रामपंचायतीचा पुढाकार; ग्रामस्थांचा उत्सफूर्त सहभाग

गोंडगाव

भडगाव (तालुका प्रतिनिधी अमीन पिंजारी) । कजगाव तालुका भडगाव येथून जवळच असलेले गोंडगाव येथे दिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायतच्या वतीने स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली,

स्वच्छता अभियानात लोकनियुक्त सरपंच राहुल पाटील ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच कर्मचारी विविध समाजसेवक मंडळांनी उत्सव पूर्तपणे संहभाग घेतला, एक पाऊल स्वच्छता कडे या संकल्पनेतून गोंडगाव गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते नागरिकांनी पुढाकार घेवून स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेबाबतची जनजागृती वाढेल व इतर गावांसाठीही हे प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली, गाव स्वच्छ सुंदर आणि आदर्श बनवण्यासाठी ग्रामपंचायतीचा हा प्रयत्न निश्चित कौतुकास्पद आहे, इतर गावांनी देखील यांचा आदर्श घ्यावा व आपले गाव स्वच्छ व सुंदर करण्याचा प्रयत्न करावा असे गावाचे सरपंच व ग्रामस्थांकडून संदेश देण्यात आला यावेळी सरपंच राहुल पाटील, उपसरपंच किरण पाटील,ग्रामपंचायत सदस्य पत्रकार रतिलाल पाटील, सर्व स्तरावरील मंडळ व समाजसेवक , ग्रामस्थ ,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here