मुसळधार पावसामुळे महापुराची स्थिती; जनजीवन विस्कळीत, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

मुसळधार

भडगाव (तालुका प्रतिनिधी अमीन पिंजारी) । कजगाव तालुका भडगाव दिनांक २७ रोजी शनिवारी रात्री च्या सुमारास मुसळधार पाऊस पडल्याने नद्या नाले दुथडी भरून वाहू लागले असून तितुर नदीला महापूर आल्याने कजगाव नागद रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक काही काळापर्यंत बंद झाली होती, गडद तितुर नदीला महापूर आल्याने नदी काटा जवळील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व नदी नाले दुथडी भरून वाहू लागल्याने काही ठिकाणी महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे ,
शेती क्षेत्रातही याचा मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. कापूस, सोयाबीन, भुईमूग आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने . शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
स्थानिक शेतकरी संघटनांनी व ग्रामस्थांनी भडगांव ,पाचोरा, तालुका ओल्ला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा असून, पंचनामे करून तातडीने आर्थिक भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.स्थानिक प्रशासनाने त्वरित शेतकऱ्याचे झालेले नुकसानाचे व पूरग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्यात यावे अशी मागणी परिसरातून मोठ्या प्रमाणात होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here