जळगाव (संपादक सुनिल पाटील) । नूतन मराठा महाविद्यालय,जळगांव व इलेक्ट्रोसॉफ्ट सिस्टिम,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संगणक शास्त्र विभागातर्फे आयोजित “career opportunity and Industry Trends” या विषयावरील कार्यशाळा संपन्न.
दि.२९-९-२०२५ रोजी महाविद्यालयात संगणक शास्त्र विभागातर्फे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के.बी.पाटील , प्रमुख वक्ते श्री. राजेश ठाकरे व संगणक शास्त्र विभागातर्फे प्रा. रमेश पाटील उपस्थित होते. प्रशिक्षक श्री. राजेश ठाकरे यांनी सध्याच्या काळात नोकरीच्या संधी मध्ये ए. आय, रोबोटिक्स व आय.ओ. टी यांची आवश्यकता विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून दिली. प्रशिक्षण सत्रानंतर संगणक विभाग प्रयोगशाळेत प्रात्यक्षिक सत्राचे आयोजन करण्यात आले. एकूण ६४ विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विशाल तेली यांनी व आयोजक समितीतर्फे उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांचे आभार प्रा. दुर्गा बर्वे यांनी मानले.







