वनजमिनीवर गांजाची लागवड; पोलिसांनी केला १ कोटी रुपयांचा गांजा जप्त

गांजा

शिरपूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर पवन मराठे) । अंमलीपदार्थ विरोधी टास्क फोर्स (कृती) नाशिक आणि धुळे पोलीस यांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत धुळे जिल्ह्यातील जामन्यापाणी गावात छापा टाकून गांजाच्या झाडांची शेती उद्ध्वस्त केली. या कारवाईत एकूण १ कोटी २ लाख ५० हजार रुपये किमतीचा २०५० किलोग्रॅम इतका गांजा जप्त करण्यात आला आहे.

दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी पोलीस उपाधीक्षक (अंमलीपदार्थ विरोधी टास्क फोर्स (कृती) नाशिक) गुलाबराव पाटील, यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, जामन्यापाणी या गावात वनजमिनीवर गांजाच्या झाडांची अवैध रित्या लागवड करण्यात आली आहे.
त्यावरुन अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, नाशिक कृती विभाग नाशिक व धुळे जिल्हा पोलीस अशांनी छापा टाकला असता तेथे 1) कालुसिंग गोंडा पावरा (वय: ३५ वर्ष, रा धावडा, तालुका वराला, जिल्हा बडवाणी, मध्य प्रदेश.), 2) कृष्णा तारासिंग पावरा (वय: २५ वर्ष, गाव सातपाणी, पोस्ट महादेव, तालुका शिरपूर जिल्हा धुळे.), 3) हरबा कुवरसिंग पावरा (वय: २७ वर्ष, रा गाव तायक्यपाणी, तालुका वराला जिल्हा बडवाणी मध्य प्रदेश.), 4) गोंडा नाना पावरा (वय: ५५ वर्ष, रा धावडा, तालुका वराला, जिल्हा बडवाणी, मध्य प्रदेश.), 5) गुलाब हाण्या पावरा, (वय: ५५ वर्ष, गाव जमान्यापाडा, पोस्ट सांगवी तालुका शिरपूर जिल्हा धुळे.), 6) कांतीलाल गुलाब पावरा (वय: २५ वर्ष, गाव जमान्यापाडा, पोस्ट सांगवी तालुका शिरपूर जिल्हा धुळे.), 7) रमेश गुलाब पावरा (वय: २१ वर्ष गाव जमान्यापाडा, पोस्ट सांगवी तालुका शिरपूर, जिल्हा धुळे) असे वनजमिनीवर सामुहिकरित्या गांजा झाडांची (कॅनाबिस प्लांटची) अवैध रित्या लागवड करुन देखभाल व रखवाली करतांना मिळुन आले.
त्यानंतर या ठिकाणी कायदेशीर पंचनामा करुन गांजाची काही झाडे कापुन व उपटुन त्यांचे प्रत्येकी 50 किलोग्रॅम वजनाचे 21 गठ्ठे बांधुन एकुण 1050 किलोग्रॅम वजनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरचे ठिकाण हे अतिदुर्गम वन परिसरात असल्याने सायंकाळी 07.00 वाजेच्या सुमारास अपरात्र झाल्याने कारवाई थांबवण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here