नगरपालिका निवडणुकीत मुक्ताईनगर व भुसावळ येथे राडा

नगरपालिका

जळगाव (संपादक सुनिल पाटील) । राज्यात आज मंगळवारी (२ डिसेंबर) नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या २६२ नगराध्यक्षपदांच्या आणि ६ हजार ४२ सदस्यपदांच्या जागांसाठी मतदान घेण्यात आले. सकाळी ७,३० वाजता या मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. आजच्या या मतदानामध्ये जिल्ह्याच्या मुक्ताईनगर व भुसावळमध्ये राडा झाला आहे.

मुक्ताईनगर येथे भाजपाच्या खासदार आणि मंत्री रक्षा खडसे या पोलिसांवरच संतापलेल्या पाहायला मिळाल्या. खासदार खडसेंचा पोलिसांसोबतच वाद झाल्याचे पाहायला मिळाले. मतदान केंद्रावर भाजपाच्या उमेदवाराला अडवल्याच्या कारणातून रक्षा खडसे पोलिसांवर संतापल्या. या प्रकारामुळे शहरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. भाजपाच्या उमेदवाराला मतदान केंद्रावर पोलिसांनी अडवल्याच्या कारणातून रक्षा खडसे पोलिसांवर संतापल्या. या दरम्यान काही मिनिटे तीव्र शाब्दिक चकमक झाली.
भुसावळ तालुक्यातील वरणगाव इथे मतदान केंद्रावरील कर्मचारी मतदारांना कमळाचे बटण दाबा असे सांगत असल्याच्या संशय वरून काही जणांनी आक्षेप घेतल्याचा प्रकार घडला. यामुळे मतदान केंद्रावर गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. वरणगाव नगरपालिकेची निवडणुसाठी मतदान सुरू असताना, प्रभाग क्रमांक १० मधील सिद्धेश्वर नगर येथील बुथवर हा गोंधळ झाला आहे. बुथ क्रमांकावरील जावळे नामक अधिकारी हा मतदारांना कमळाचे बटन दाबण्यासाठी सांगत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here