रुग्णाच्या मृत्यूवरून संताप, सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड

सह्याद्री हॉस्पिटल

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) । हडपसर परिसरातील सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील हॉस्पिटल प्रशानसाच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप करत मृताच्या नातेवाईकांनी ही तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या बाहेर ठिय्या मांडला असून रुग्णालयाबाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी हॉस्पिटलमध्ये घुसून रिसेप्शन विभाग, काचेच्या पार्टिशन आणि संगणकांची तोडफोड केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तोडफोडीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी रुग्णाच्या मृत्यूवरून निर्माण झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून समोर येत आहे.
बुधवारी सकाळी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असणाऱ्या एका ७७ वर्षीच रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णाच्या मृत्यूवरून जवळपास १०-१२ नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केली. पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे.
हडपसर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णलयात उपचार घेणाऱ्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णाच्या मृत्यूमुळे त्याच्या नातेवाईकांच्या एका ग्रुपने ११ वाजण्याच्या सुमारास गोंधळ सुरू केला. त्यावरून त्यांनी दगडफेक सुरू केली. हॉस्पिटलचे प्रवेशद्वार आणि खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतले. काचा फोडण्यासाठी त्यांनी बॅरिकेड्स वापरले होते. घटनेची माहिती मिळताच आमचे पोलिस तिथे पोहचले आणि त्यांना ताब्यात घेतले.या घटनेत कुणाला दुखापत झाली नाही.
हॉस्पिटलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. सुनील राव एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हणाले की, केरू सदाशिव सपकळ यांना २८ नोव्हेंबरल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here