घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी वागळे इस्टेट पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून जेरबंद

वागळे इस्टेट पोलीस

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) । वागळे इस्टेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ७१०/२०२५ बी.एन.एस. २०२३ कलम ३३१(३), ३०५ (अ) प्रमाणे मधील फिर्यादी सौ. सुरेखा शशिकांत खेडेकर, वय ४१ वर्षे, व्यवसाय घरकाम, राह. एकता रहिवाशी संघटना चाळ, अंबिका नगर ०२, शिवसेना शाखेच्या मागे, रोड नं १६, वागळे इस्टेट, ठाणे.या दि २४/११/२०२५ रोजी घराच्या खोलीस कुलूप लावून कामावर गेल्या असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहते घराच्या खोलीचे बंद दरवाजाचा कडी कोयंडा तोडून त्यावाटे घरात प्रवेश करून रू. ८२,०००/- किं.चे दागिने व रोख रक्कम व लबाडीने घरफोडी चोरी करून नेले. सदर बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि २७/११/२०२५ रोजी नमूद गुन्हा नोंद केला आहे.

सदर गुन्हयातील आरोपी याच्या गुन्हा करण्याच्या मोडस ऑपरेंडी व सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारे सदर आरोपी हा मुंबई पोलीसांचे अभिलेखावरील आरोपीत नामे दिपक रामगोपाळ वैश्य वय ४० वर्षे रा. प्लॉट नं ४५, रूम नं ११०, भाजी मार्केट रोड, कॉग्रेस ऑफीसचे बाजूला, शिवाजीनगर, गोवंडी, मुंबई असल्याचे निष्पन्न केले. त्याच्याविरूध्द अंदाजे १५ घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपी याचा त्याच्या राहत्या घरी वारंवार शोध घेतला परंतू तो मिळून येत नव्हता. सदर आरोपी हा तीन हात नाका, वागळे इस्टेट, ठाणे या ठिकाणी येणार असल्याबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाल्याने सपोनि कांबळे व गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून त्यास ताब्यात घेवून सदर गुन्हयात दि ०६/१२/२०२५ रोजी ०३.४५ वा. अटक करण्यात आली. त्याच्याकडे केलेल्या तपासादरम्यान त्याने खालील गुन्हे केले आहेत.

वागळे इस्टेट पोलीस स्टेशन उघडीस आलेले गुन्हे ७०४/२०२५ बी.एन. एस कलम ३३१ (३),३३१ (४),३०५ (अ) व, ७०८/२०२५ बी.एन.एस. २०२३ कलम ३३१ (३),३०५(अ), ७१०/२०२५ बी.एन.एस. २०२३ कलम ३३१(३), ३०५ (अ) असून, आरोपीकडून १७,५००/- रुपये किंमतीचे ३ ग्रॅम वजनाचे गळयातील सोन्याचे पॅडल जु.वा., १७,५००/- रुपये किंमतीचे ३ ग्रॅम वजनाचे कानातील दोन सोन्याचे टॉप जु.वा., १,०००/- रुपये किंमतीचे ४ ग्रॅम वजनाचे चांदिचे पायातील पैंजन जु.वा., १,०००/- रुपये किंमतीचे ४ ग्रॅम वजनाचे चांदिचे पायातील जोडवे जु.वा. १०,०००/रू. किं.ची ०५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जु.वा. किं.सु., २०,०००/-रू. किं. ची १०.०७० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन त्यात हार्ट शेप आकाराचे त्यास एस अक्षर असलेले ०१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पान जु.वा. किं.सु., ५०,०००/-रू. किं.चा १०.४१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस जु.वा. किं.सु., ७५,५००/- रू रोख रक्कम त्यात ५००/- रू दराच्या १७१ नोटा., १,९२,५००/- रू (एकूण ३१.४८० ग्रॅम सोने, ०८ ग्रॅम चांदी व रोख रक्कम (७७ ७००/-=. याप्रमाणे गुन्हयातील मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे.
टिळकनगर पो. स्टे गुन्हा रजि नं ०४/२०११ भा.द.वि कलम ३८०,४११ प्रमाणे, घाटकोपर पो.स्टे., मुंबई गुन्हा रजि नं २०७/२०१४ भा.द.वि कलम ३८०,३४ प्रमाणे, मानखुर्द पो.स्टे., मुंबई गुन्हा रजि नं ११२/२०१६ भा.द.वि कलम ४५४,३८० प्रमाणे, तुर्भे पो.स्टे. मुंबई गुन्हा रजि नं ३४१/२०१६ भा.द.वि कलम ३८० प्रमाणे, अॅटॉप हील पो. स्टे, मुंबई गुन्हा रजि नं ११९/२०१९ भा.द.वि कलम ४५४, ३८० प्रमाणे, धारावी पो. स्टे, मुंबई गुन्हा रजि नं १८३/२०१९ भा.द.वि कलम भा.द.वि ४५४,३८० प्रमाणे, धारावी पो. स्टे, मुंबई गुन्हा रजि नं १९१/२०१९ भा.द.वि कलम भा.द.वि ४५४, ३८० प्रमाणे, गोवंडी पो. स्टे, मुंबई गुन्हा रजि नं ४०/२०१९ भा. द. वि कलम भा.द.वि ३८० प्रमाणे, कुरार पो. स्टे, मुंबई गुन्हा रजि नं ४६७/२०१९ भा. द. वि कलम भा.द.वि ३८० प्रमाणे, विरार पो. स्टे गुन्हा रजि. नं ११७६/२०२१ भा.द.वि कलम ३८० प्रमाणे, आचोळे पो.स्टे, मिरा भायंदर गुन्हा रजि. नं २२७/२०२२ भा.द.वि कलम ४५४,३८० प्रमाणे, विरार पो. स्टे गुन्हा रजि नं ४३१/२०२२ भा.द.वि कलम ३८० प्रमाणे, मेघवाडी पो.स्टे, मुंबई गुन्हा रजि नं १३०/२०२३ भा.द.वि ४५४,३८० प्रमाणे, एम.आय.डी.सी. पो. स्टे, मुंबई गुन्हा रजि नं ६५५/२०२३ भा.द.वि ४५४, ३८० प्रमाणे, ए.पी.एम.सी पो.स्टे, नवी मुंबई गुन्हा रजि नं २४२/२०२४ भा.द.वि ४५४,३८० प्रमाणे यापैकी आरोपी दिपक रामगोपाळ वैश्य याने श्रीनगर पो. स्टे गुन्हा रजि नं ७८५/२०२५ बी. एन. एस कलम ३३१(३),३०५, श्रीनगर पो. स्टे गुन्हा रजि नं ७८९/२०२५ बी. एन. एस कलम ३३१ (३),३०५ या गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
सदरची कामगिरी ही मा. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर, मा. विनायक देशमुख, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे, मा. प्रशांत कदम, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५, वागळेइस्टेट, ठाणे, मा. दिपाली खन्ना, सहाय्यक पोलीस आयुक्त, वागळे विभाग, ठाणे यांचे मार्गदर्शना खाली वागळेइस्टेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिवाजी गवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री प्रविण सावंत, पोलीस निरीक्षक (प्रशा) श्री देवकर यांचे निर्देशानुसार तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक/ए.आर. कांबळे, तसेच पोहवा /१४७२ गावडे, पो.ना/७२३१ दाभाडे, पो.ना/७१६५ चव्हाण, पोशि/५३८९ मगरे, पो. शि/८३१९ पाटील व पोशि/२७७१ जाधव यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here