रसीक ठक्कर ,संजय शाह यांच्या सिद्धिविनायक बिल्डर्स यांसह सोसायटी पदाधिकारी यांच्याविरोधात बनावट कागद पत्रांच्या आधारे भूखंड लाटल्याबाबत कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
मुंबई (संपादक सुनिल पाटील) । मालाड (पूर्व) येथील मालाड लकी को-ऑप. हौसिंग सोसायटीच्या पुनर्विकास प्रकरणात तब्बल २५ कोटींचा जमीन घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून कुरार पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) , ३३६ (२) , ३३८ , ३ (८) नुसार दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी गुन्हा नोंद केलेला आहे. त्यानुसार विकासक सिद्धिविनायक बिल्डर्स याचे संचालक रसिक ठक्कर व काही सोसायटी पदाधिकार्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारदार श्रीमती नताशा नौशाद शेख यांनी फिर्याद दिलेली आहे.
फिर्यादीने दिलेल्या फिर्यादी नुसार , पुनर्विकास कराराच्या मसुद्यात युनिट्स नमूद होते; सदस्यांनी त्यावर सह्या केल्या. मात्र, नोंदणीवेळी १८ खोडून १७ अशी बनावट खाडाखोड करून त्यांच्या शॉप क्र. ८ चा उल्लेख हटवल्याचा गंभीर आरोप आहे. ही दुरुस्ती सदस्यांच्या स्वाक्षरीशिवाय करण्यात आली याची माहिती घेताना आणखी काही अपहार आणि गुन्हे उघड झाल्याने फिर्यादीने गुन्हा नोंद केला आहे.
बनावट ठराव व बैठका — “ज्या सभा झाल्याच नाहीत त्या झाल्या आहेत असे दाखवल्या दाखवल्या”
या बाबत सविस्तर वृत्त असे की, मालाड लकी सहकारी गृहनिर्माण संस्थेची जुनी इमारत या सहकारी गुहनिर्माण संस्थेची कसलीही बैठक सभा झालेली नसताना कोणतीही वार्षिक सर्वसाधारण सभा आणि विशेष सर्वसाधारण सभा झाल्याचे दाखवले. मात्र प्रत्यक्षात यातील काहीच झालेले नाही. बनावट लेटरहेड व ठराव तयार करून बैठका झाल्याचा खोटा आभास निर्माण करण्यात आला.विकासकाची ऑफर तारीख व सोसायटी निर्णयाच्या तारखा एकमेकांना न जुळणाऱ्या, कालमर्यादेच्या अशक्य अशा आहेत.
“धोकादायक इमारत” हा बनावट आधार?
२०१७ ची मुंबई महानगर पालिकेची धोकादायक आणि मोडकळीला आल्याची नोटीस दाखवली असली तरी इमारत २०२१ पर्यंत उभी होती. फिर्यादीचा आरोप — “धोकादायक” हा कथित अहवालही संगनमताने बनवलेला, सदस्यांना घाबरवून जागा रिकामी करवून घेण्यासाठी वापरलेला.
जमिनीचा ताबा सोसायटीला नव्हे तर विकासकाच्या संबंधिताला?
Development Agreement मध्ये सोसायटीला “Deemed Conveyance” देण्याचे आश्वासन असताना, प्रत्यक्षात २३ मे २०१९ रोजी रोजी जमीन विकासक रसिक ठाक्कर यांच्या भावाच्या नावावर वळवली गेल्याचा फिर्यादीचा दावा आहे.
प्राथमिक तपासात ₹ ३५,५७,२६९ एवढ्या रकमेची प्राथमिक फसवणूक गुन्हा आणि बनावटीकरण २५ कोटी पेक्षा जास्त अपहार झाल्याचे उघड झाले आहे.
तक्रारदारांच्या फ्लॅट क्र. ३ फ्लॅट ९ (खाजगी जागेसह) आणि शॉप क्र. ८ याबाबत विकासकाने दिलेली भाडे-कार्पस फंडाची रक्कम अनेक महिने थांबवली. भाडे थकबाकी व कार्पस फंड मिळून प्राथमिक नुकसान : ₹ ३५,५७,२६९ तर संपूर्ण जमीन व्यवहाराचा अंदाजित व्याप : ₹ २५ कोटींपेक्षा जास्त असल्याने सदर गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात यावा अशी मागणी फिर्यादीचे केली आहे.
फिर्यादीचे मुख्य आरोप खालीलप्रमाणे.
सोसायटी पदाधिकार्यांनी सदस्यांचा “फौजदारी पात्र विश्वासभंग” केला असल्याने भारतीय न्याय संहिता कलाम ३१६ हे कलम लागू होते त्यामुळे सदर कलम वाढ करावी अशी मागणी फिर्यादीने केली आहे.
तपास आर्थिक गुन्हे कक्षाकडे वर्ग करावा अशी फिर्यादीची मागणी ,
प्रकरण १० कोटी पेक्षा जास्त आर्थिक अपहाराशी निगडीत असल्याने कागदपत्रीय गुंतागुंत पाहता तपासच आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात यावा अशी मागणी फिर्यादीने केली आहे.
आरोपींच्या अटकपूर्व जामिनास कडक हरकत
आरोपी रसिक ठाक्कर यांनी पोलिस नोटीसा टाळल्या आहेत , पोलीस अधिकारी यांना प्राथमिक चौकशी आणि तपासात कसलेली सहकार्य केले नाही, धमक्या दिल्या — अशी फिर्यादीची नोंद. पासपोर्ट जप्त करून अटक करण्याची मागणी केली आहे.
घोटाळ्याची रक्कम : ₹ २५ कोटी पेक्षा जास्त सोसायटी सिटी सर्वे क्रमांक 453 शंका निर्माण करणारे मुख्य मुद्दे
• १८ ऐवजी १७ अशी युनिट्स मध्ये खाडाखोड
• शॉप क्र. 8 ‘गायब’
• बनावट ठराव, सभा झाल्याचा खोटा दावा
• खोटा धोकादायक इमारत अहवाल
• जमीन सोसायटीऐवजी विकासकाच्या भावाच्या नावावर
• भाडे व कार्पस फंड न देणे
सर्वांच्या नजरा आता EOW व न्यायालयाकडे
मालाडमधील हा कोट्ट्यावधी पुनर्विकास घोटाळा केवळ एक सोसायटीपुरता सीमित नसून, मुंबईतील पुनर्विकास प्रणालीतील व्यापक भ्रष्टाचाराचा आरसा मानला जात आहे. या पूर्वी देखील सदर आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे.







