कबनूरात रेणुका देवीची यात्रा उत्साहात साजरी

रेणुका देवी

सातारा (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर सतीश चव्हाण) । सालाबाद प्रमाणे रेणुका देवीची यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली.पहाटे पाच वाजता रेणुका चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सतीश चव्हाण व त्यांच्या पत्नी सौ दिपाली चव्हाण यांच्या हस्ते देवीला अभिषेक घालून पूजा करण्यात आली. सकाळी सात वाजता अण्णाप्पा चव्हाण व भारत चव्हाण यांच्या हस्ते आरती करण्यात आली . पालखीचे पूजन रामचंद्र चव्हाण व शंकर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

पालखी सकाळी अकरा वाजता पावतका स्थान सुतारमळा कोल्हापूर रोड कबनूर या ठिकाणी आली .पावतका स्थान या ठिकाणी पालखी भेट देऊन महालिंग मळा बाड्याचा मळा या ठिकाणी सालाबाद प्रमाणे माहेर करून घेण्यासाठी निघाली . यशवंत कॉलनीतून बाड्याचा मळा येथे पालखी आल्यानंतर माहेरचे मानकरी गजानन पाटील. किशोर पाटील व इतर सर्व पाटील परिवारातील पुरुष महिला वर्गांनी पालखीचे स्वागत केले. सर्व पाटील परिवारांच्या वतीने देवीला माहेर करण्यात आले .या ठिकाणी पाटील कुटुंबाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
रेणुका देवीचे पालखी तेथून खोचगे. स्वामी. छोटू देव मामा . पाटील .कोरे या कुटुंबाच्या कडे माहेर करून घेण्यासाठी निघाली.हे सर्व माहेर करून घेऊन सायंकाळी सहा वाजता पालखी परत पावतका स्थान या ठिकाणी परत आली.सायंकाळी गावातील सर्व भक्तजन आंबील ,भाजी भाकरी नैवेद्य घेऊन देवीच्या पूजेसाठी हजारो भाविक येत होते . रात्री साडेसात वाजता भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण मंडल उपाध्यक्ष बाळासाहेब माने व त्यांच्या पत्नी वैशाली माने यांच्या हस्ते व सरपंच सुलोचना कट्टी .बबन केटकाळे .निलेश पाटील, सुधीर पाटील.किशोर पाटील. गजानन पाटील. रजनी गुरव, सुनील काडाप्पा.शोभा पोवार माजी सरपंच यांच्या उपस्थित रेणुका देवीची आरती करण्यात आली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादांचे वाटप करण्यात आले. महाप्रसादासाठी बाळासाहेब माने .शीतल पाटील .प्रल्हाद चव्हाण.संदीप पांडव .मारुती पांडव.विद्या शिंदे शालाबाई मोरे. बापू मोरे. आचारी उदय येसणे व त्यांची टीम यांचे सहकार्य लाभले. वर्षा प्रल्हाद चव्हाण यांनी सर्व भक्तांच्यासाठी आंबील चे नियोजन केले होते.इचलकरंजी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मा. डॉ. राहुलजी आवाडे साहेब यांनी रेणुका देवीच्या यात्रेला भेट दिली .देवीला हार अर्पण करून देवीची पूजा केली. आमदार साहेबांनी पावतका स्थान सुशोभीकरणासाठी 16 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल ट्रस्टचेअध्यक्ष सतीश चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
रात्री पालखी कबनूर गावातून माहेर घेत फिरून शनिवारी पहाटे कचाला( खाय फोडण्यासाठी )निघाली. पालखी कच (खाय खेळून) झाल्यानंतर जोक्ती व देवामामा यांनी खायी मध्ये आपल्या स्वतःच्या हातातील बांगड्या (काकणे)फोडल्या.गावातील हजारो भक्तांनी देवीची पूजा करून आशीर्वाद घेतला .यात्रेच्या ठिकाणी नारळ, हळदीकुंकू, हारतुरे, प्रसादाचे, खेळण्याचे दुकाने मांडले होती. यात्रा उत्कृष्ट प्रकारे पार पाडण्यासाठी संजय चव्हाण सर. समाधान चव्हाण .संदीप चव्हाण, सुरेश चव्हाण. शिवाजी चव्हाण कोतवाल .बाबू चव्हाण .उद्धव सूर्यवंशी.सुहास चव्हाण .सुनिता शशिकांत चव्हाण .शोभा चव्हाण.शेवंता चव्हाण, अक्काताई अशोक चव्हाण, आणि चव्हाण परिवार. महालिंगमळा मधील सर्व पाटील परिवार हातगणंलेतील पांडव परिवार ,सर्व पाहुणे मंडळी व गावातील भक्तगण यांनी सहकार्य केले व परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here