हिसार (हरियाणा) (वृत्तसंस्था) । थंडीचा तडाखा वाढल्यामुळे सकाळ आणि संध्याकाळच्या सुमारास धुक्याची चादर पसरतआहे. मात्र, वाहन चालकांना या धुक्याचा जोरदार फटका बसत आहे. हरियाणामध्ये धुक्यामुळे आज (दि.१४) दोन भयंकर अपघात झाले. या अपघातात बस, कार, ट्रक, दुचाकी अशा अनेक गाड्या एकमेकांना धडकल्याने मोठे नुकसान झाले असून, अपघातामुळे वाहतुक कोंडी झाली होती.
हरयाणाऱ्या हिसारमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर धिकटाना येथील वळणाजवळ पहिला अपघात झाला. धुक्यामुळे हरयाणा रोडवजेजच्या दोन बस अन्य वाहनांना धडकल्या. तर दुसऱ्या घटनेत कैथल रोडवेजची एक बस डंपरला धडकली आणि पुढे जाऊन अनेक गाड्यांना धडकली. त्यानंतर मागून आलेली एक बस उभ्या गाड्यांना धडकली. त्यानंतर एक ट्रक आणि एक दुचाकी या गाड्यांना धडकली. या अपघातात अनेक लोकं गंभीर जखमी झाले आहेत. सर्वांना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.







