पुणे (उपसंपादक मीर आरेकर) । राजगुरुनगर येथे खासगी कोचिंग क्लासेसमध्ये भयंकर गँगवॉर घडले आहे. खासगी क्लासमध्ये एका मुलावर त्याच्या क्लासमेटनेच हल्ला केला. या हल्ल्यामध्ये विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, राजगुरुनगर येथील संस्कार कोचिंग क्लासेसमध्ये लहान मुलांचे भयंकर गँगवॉर पाहायला मिळाले. वर्गामध्ये शिक्षक शिकवत असतानाच एका मुलाने त्याच्या क्लासमेटचा गळा चिरला. वर्गातच झालेल्या या चाकू हल्ल्याने एकच खळबळ उडाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
माहिती मिळताच राजगुरुनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्ला करणारा विद्यार्थी घटनेनंतर दुचाकीवरुन फरार झाला आहे. या हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. या भयंकर घटनेने आता खासगी क्लासमधील मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.







