महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ भडगाव तालुकाध्यक्षपदी रतिलाल पाटील तर उपाध्यक्षपदी भास्कर पाटील महिंदळे

पत्रकार

भडगाव (तालुका क्राइम रिपोर्टर मनिष सोनवणे) । महाराष्टृ राज्य पत्रकार संघाची रविवारी (दि. १४) दुपारी १ वाजता भडगाव येथील नुरानी लान्स येथे संघटनेचे जेष्ट पदाधिकारी किशोरभाऊ रायसाकडा, राकेशभाऊ सुतार, माजी अध्यक्ष अशोकबापु परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीखाली ही बैठक पार पडली.

या बैठकीत ६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त चर्चा करण्यात आली. तसेच भडगाव तालुक्यासह जिल्हयाची नवनिर्वाचीत कार्यकारीणी नियुक्त करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीत पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर पाटील महिंदळे यांनी आपल्या पदाचा ठरल्याप्रमाणे या बैठकीत राजीनामा दिला. त्यांचे जागी नवनिर्वाचीत भडगाव तालुका अध्यक्षपदासाठी रतिलाल पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच पत्रकार संघाच्या नवनिर्वाचीत उपजिल्हाअध्यक्षपदी सर्वानुमते भास्कर पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी पत्रकार संघाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या ग्रामीण भडगाव तालुका अध्यक्ष पदी रतिलाल पाटील गोंडगाव तर जळगाव जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी भास्कर पाटील महिंदळे यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी जेष्ठ पत्रकार अशोक बापू परदेशी, संजय सोनार, अब्रार मिर्झा, अमिन पिंजारी, निंबा पाटील,आनंदा महाजन, मनीष सोनवणे, चेतन महाजन, सतीश पाटील,संजय महाजन, नरेंद्र भोसले, गणेश राऊत, नाना पाटील, निलेश पाटील, अलीम शहा, प्रमोद पवार,संजय पाटील, दिलीप पाटील, सलाउद्दीन शेख, गोपाल भोई, प्रल्हाद पवार, लक्ष्मण पाटील, व मान्यवर उपस्थित होते.

पत्रकारपत्रकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here