संत ज्ञानेश्वर विद्यालयात मुलींसाठी स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण

कराटे

जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) । संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थिनींच्या स्वसंरक्षण व आत्मविश्वास वृद्धीसाठी मुलींसाठी कराटे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रसंगी ब्लॅक बेल्ट कराटे प्रशिक्षिका प्रज्ञा बोदडे यांचे विद्यालयाच्या वतीने सस्नेह स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री. मुकेश नाईक यांनी मुलींसाठी स्वसंरक्षणाचे महत्त्व स्पष्ट करत, कराटे प्रशिक्षणामुळे शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि आत्मविश्वास वाढतो, असे मत व्यक्त केले.
ब्लॅक बेल्ट प्रज्ञा बोदडे यांनी विद्यार्थिनींना कराटे प्रशिक्षणाची ओळख करून देत, प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. या उपक्रमाला शिक्षकवृंद व विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यालयात राबविण्यात येणारा हा उपक्रम मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here