अहिल्यानगर (जिल्हा क्राइम रिपोर्टर दिपक वरखडे) । संपुर्ण महाराष्ट्रात भाविक भक्तांसाठी प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र पिंपळगाव रोठा येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवाचा यात्रोत्सव शनिवार दि . ३ ते सोमवार दि . ५ रोजी मोठ्या उत्साहाच्या निमित्त नवी मुंबई येथील कामोठे येथे कुलदैवताचा तळी – भंडार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती श्री खंडोबा देवस्थान, शिव मल्हार सेवाभावी संस्था व ग्रामस्थांनी दिली .
कोरठणगड पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त आणि मुंबईकर ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने कुलदैवत श्री खंडेराय देवा चा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शनिवार दि. ३ ते सोमवार दि. ५ या कालावधीत मोठ्या भक्तिभावाने व परंपरेने संपन्न होत आहे. या पावन यात्रेनिमित्त कुलदैवताचा पारंपरिक तळी-भंडार सोहळ्याचे माता-भगिनींसाठी सौभाग्याचे प्रतीक असणारे हळदी–कुंकू या श्रद्धामय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
खंडेरायाचा अभंगाप्रमाणे जय जय खंडेराया मल्हारी,तुजविण कोण धरी तारी, तळी-भंडारी भक्त जमले , नामी तुझ्या मन रमले. हळदी-कुंकवाची उजळ शान,मातृत्वाचा पावन सन्मान, तुज कृपेने सुख-समृद्धी, दे नित्य आम्हा खंडेराया सिद्धी.या यात्रा महोत्सवाच्या पूर्वनियोजनासाठी,मंदिर परिसरातील सेवा व्यवस्थेसाठी,आगामी पालखी सोहळा भक्तीमय, शिस्तबद्ध व निर्विघ्न पार पडावा,या मंगल हेतूने,कुलदैवताचा तळी-भंडार सोहळा,रविवार दि. २१ रोजी सकाळी १०:३० वाजता नवी मुंबई तील कामोठे येथील साई मिरॅकल सोसायटी हॉल येथे आयोजित करण्यात आला असूनमहाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्व भाविक भक्तांनी आपली अमूल्य उपस्थिती लावून या पावन सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री क्षेत्र पिंपळगाव रोठा येथील श्री खंडोबा देवस्थान, शिवमल्हार सेवाभावी संस्था,भाविक भक्त व ग्रामस्थ,पिंपळगाव रोठा, पंचक्रोशी,मुंबईकर व पुणेकर मंडळी यांनी केले आहे .
पनवेल चे माजी आमदार बाळाराम पाटील, महानगर बँकेच्या गीतांजली शेळके, श्री खंडोबा देवस्थानचे माजी अध्यक्ष अॅड.पांडुरंग गायकवाड, महाराष्ट्रात राज्य अल्पसंख्याक समितीचे सदस्य हॅप्पी सिंग, हरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामदास शिंदे,पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विकास घरत, नगरसेवक प्रदीप भगत, मुंबई महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी किसनराव पावडे पाटील,शिवसेना रायगड जिल्हा प्रवक्त सुवर्णा वाळुंज, पारनेर तालुका युवा मंडळाचे अध्यक्ष गणपत वाफारे, रायगड जिल्हा शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष चंद्रभान चिकणे , पारनेर तालुका रहिवासी संघाचे सचिव कृष्णा ढोमे, युवा उद्योजक शेखर काशीद, पारनेर तालुका रहिवासी संघाचे अध्यक्ष भाऊ पावडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते शिवाजी सुपेकर, महाराष्ट्र पोलीस दलाचे अमर पानमंद आणि मुंबईकर मंडळी, देवस्थानचे मानकरी व शिवभक्त या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत .







