पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) । बुधवारी (दि.०३) श्रीनाथ विद्यालयात निर्भया पथक पंढरपूर उपविभागाच्या टीमने सदिच्छा भेट देत विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शनपर उपक्रम राबवला. महिला / विद्यार्थिनींची सुरक्षा, सायबर सुरक्षेची जाणीव आणि कायदेशीर माहिती विद्यार्थिनींपर्यंत पोहोचविणे हा या भेटीचा मुख्य उद्देश होता.
निर्भया पथकातील अधिकारी श्रीम. निर्मला वाघमारे व महिला पोलिस कर्मचारी तसेच श्री अजित जाधव,श्री पांडुरंग टिंगरे यांनी शाळेतील विद्यार्थिनींशी संवाद साधत महिला सुरक्षा कायदे, पोलीस हेल्पलाईनचा योग्य वापर, सायबर गुन्हे टाळण्याचे उपाय, तसेच स्वसंरक्षणाची मूलभूत माहिती याबाबत मार्गदर्शन केले.*
विद्यार्थिनींनीही उत्साहाने सहभाग घेत विविध प्रश्न विचारले. पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यांना संबंधित माहिती देत सतर्क आणि सजग राहण्याचे महत्त्व स्पष्ट केले. * विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री महेश इंगोले सर यांनी निर्भया पथकाचे आभार मानत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढून सुरक्षिततेची जाणीव दृढ होते, असे सांगितले.







