मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) । मोठ्या चित्रपटात आणि वेब सिरीजमध्ये अभिनयाचं काम देण्याचं आमिष देऊन तरुणींची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. आरोपी हा ऑडिशनच्या बहाण्याने तरुणींना बिकिनीवरील तसेच त्यांचे अर्धनग्न फोटो मागायचा नंतर त्यांना बालमेल करायचा. मुंबईतील खार पोलिसांनी या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिलांनी पोलिसांना सांगितले की, अज्ञात आरोपीने स्वतःची प्रसिद्ध निर्माता विकास बहल अशी ओळख सांगितली होती आणि या नावाने नावाने त्याचं इंस्टाग्राम अकाउंट देखील होतं. ऑडिशनच्या बहाण्याने बऱ्याच मुलींशी संपर्क साधल्यानंतर, आरोपीने कथित निवड प्रक्रियेचा भाग म्हणून पीडित तरुणींकडून बिकिनीवरील तसेच त्यांचे अर्धनग्न फोटो मागितले. त्यामुळे पीडित तरुणींनी आरोपीला निर्माता समजून त्याला पैसे दिली आणि काही खाजगी फोटो सुद्धा पाठवले आणि त्यांनतर आपला फोन आरोपी हा बंद करायचा. यातील कित्येक तरुणींना तर आरोपीने भेटण्यासाठी बोलवलं होतं. जेव्हा खरा निर्माता-दिग्दर्शक विकास बहल यांना त्यांच्या नावाने फसवणूक सुरू असल्याचे कळलं तेव्हा त्यांनी खार पोलिस ठाण्यात जाऊन एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली.







