जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) | प्रभाग क्रमांक १९ मधून शिवसेना शिंदे गटाकडून मोहन पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. सामाजिक व धार्मिक कार्यातून उभे राहिलेले नेतृत्व म्हणून मोहन पाटील यांची ओळख असून, गेल्या अनेक वर्षांपासून ते प्रभागातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सक्रिय आहेत.
गरिब, कष्टकरी, महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सातत्याने मदतीचा हात पुढे करणारे मोहन पाटील यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. धार्मिक कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव, आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहिमा तसेच आपत्तीच्या काळात केलेली मदत यामुळे त्यांचा जनसंपर्क भक्कम झाला आहे.
स्थानिक प्रश्नांची सखोल जाण, सर्वसामान्यांशी थेट संवाद आणि पक्षनिष्ठा या बळावर मोहन पाटील हे प्रभाग १९ साठी योग्य उमेदवार ठरतील, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने मोहन पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी एकमुखी मागणी होत आहे.







