सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) । मंगळवेढा पोलीस ठाणे येथे आज (दि.१७) पोलीस पाटील दिनाच्या अनुषंगाने मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांची मंगळवेढा पोलीस ठाणे येथे बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीस विभागीय पोलीस अधिकारी श्री शिवपूजे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिडे, पोलीस उपनिरीक्षक पिसे, पोलीस हेड कॉ. यादव, पवार, म पो हेड कॉ. घोडके तसेच अन्य अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. उपस्थित पोलीस पाटील यांना मा शिवपुजे साहेब यांनी त्यांच्या घराच्या कर्तव्याबाबत माहिती देऊन सर्व पोलीस पाटील यांनी आपापल्या गावांमध्ये ग्रामसुरक्षा दल सक्रिय करण्याबाबत सूचना दिले.
पो. नि. बोरीगीडडे यांनी पोलीस पाटील यांनी कशा पद्धतीने काम करणे अपेक्षित आहे याबाबत मार्गदर्शन केले. सदर वेळी उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून काम करणारे 1) येळगी सौ राजश्री इंगोले 2) हुलजंती – जिवाजी सोनवले 3) घरनिकी श्री जावेद मुलानी 4) लक्ष्मी दहिवडी श्री मधुकर पाटील 5) डोनज श्री कोळी या पोलीस पाटील यांचा मा. शिवपूजे यांचे हस्ते सत्कार करून त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले.







