ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) । ठाणे पोलीस आयुक्तालयात जबरी चेन स्नॅचिंगच्या होणाऱ्या घटनांना आळा घालणेसाठी मा. वरीष्ठांनी सुचना दिलेल्या होत्या,त्याप्रमाणे गुन्हे शाखा,ठाणे शहर यांचेकडुन सदर घटनांना आळा घालणेसाठी उपाययोजना चालु असतानाच गुन्हे शाखा,घटक २,भिवंडी येथील अधिकारी व अंमलदार यांना यश प्राप्त झाले आहे.
गुन्हे शाखा,घटक – २,भिवंडीचे वपोनि जनार्दन सोनवणे यांचे अधिपत्याखालील पोउनि / रविंद्र बी. पाटील व पथक हे नारपोली पो. ठा. गुन्हा रजि. नं. १०२७/२०२५,भा.न्या.सं.क. ३०९ (४), ३ (५) या गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी अब्बास उर्फ बड्डा युनूस सय्यद रा. आंबिवली, ता. कल्याण याचे नाव निष्पन्न करुन त्यास बिदर,कनार्टक राज्य येथुन शिताफीने ताब्यात घेण्यात आले. नमुद आरोपीकडे केलेल्या कौशल्यपुर्ण तपासात त्याने त्याच्या साथीदारासह भिवंडी,मुंब्रा,ठाणे,उल्हासनगर व अंबरनाथ शहरात २० चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली देवुन,सदर आरोपीत याचेकडुन एकुण २३२.५ ग्रॅम वजनाचे व ३०,२२,५००/- रू. किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. सदर गुन्हयात आरोपी नामे अब्बास उर्फ बड्डा युनूस सय्यद,वय २१ वर्षे,रा. आंबिवली,ता. कल्याण यास अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी याची गुन्हेगारी पार्श्वभुमी असुन,त्याचेविरुध्द यापुर्वी खडकपाडा पोलीस स्टेशन येथे चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत. त्याचेकडे अधिक तपास करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी ही मा. डॉ. पंजाबराव उगले,अपर पोलीस आयुक्त,गुन्हे,ठाणे,मा. अमरसिंह जाधव,पोलीस उप आयुक्त,गुन्हे,ठाणे,मा. शेखर बागडे सहा.पो.आयुक्त गुन्हे शोध – १,ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा,घटक – २ भिवंडीचे वपोनिरी. जनार्दन सोनवणे,सपोनि/श्रीराज माळी,सपोनि/मिथुन भोईर,पोउनि/रविंद्र बी. पाटील,पोउनि/रामचंद्र जाधव,पोउनि/राजेश शिंदे,सपोउनि / सुधाकर चौधरी,सपोउनि/सुनिल साळुंके,पोहवा साबीर शेख,पोहवा प्रशांत राणे,पोहवा निलेश बोरसे,पोहवा/सुदेश घाग,पोहवा वसंत चौरे, पोहवा / शशिकांत यादव,पोहवा/ राजेश गावडे,पोहवा/ रंगनाथ पाटील,पोहवा वामन भोईर,पोहवा/प्रकाश पाटील,पोहवा किशोर थोरात,मपोहवा माया डोंगरे,मपोहवा/ अनुष्का पाटील,मपोहवा/ दक्षता सुतार,मपोहवा/ सायली गंभेरा,पोना/ योगेश कवडे,पोशि/अमोल इंगळे,पोशि/ विजय कुंभार,पोशि/ नितीन नंदीवाले,पोशि/ सर्फराज तडवी,पोशि/ भावेश घरत,चापोशि/ रविंद्र साळुंखे यांचे पथकाने केलेली आहे.







