आरोग्याची काळजी घेवून गणेशोत्सव साजरा करूया – भाजपाचे तन्मय गांगुर्डे यांचे आवाहन

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्र सरकार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण सर्व गणेश भक्तांनी कोरोना विषाणूच्या संकटामुळे महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी यंदाचा उत्सव कोडिव १९च्या आरोग्य विषयक काळजी घेवून साजरा करावा.यंदाचा उत्सव मर्यादित स्वरूपात साजरा होत असला तरी पुढील वर्षी मात्र गेल्या वर्षीच्या उत्सवापेक्षा अधिक उत्सवाहात आणि भव्य दिव्य असा साजरा करण्याचे प्रयत्न करूया.असे आवाहनन भाजपाचे तन्मया गांगुर्डे यांनी केले आहे.
शासनांच्या प्रयत्नांना सहकार्य करू,अशी भूमिका यावेळी महाराष्ट्रातील आणि नाशिकसह तालुक्यातील सर्व गणेश मंडळानी व पदाधिकारी जाहिर करून सहकार्य करावे.महाराष्ट्रसह सर्व जिल्ह्यातील शहर आणि तालुकासह प्रमुख गणेश मंडळी आगामी गणेशोत्सवा अनुषंगाने व्हिसीव्दारे संवाद साधून गणेश उत्सव साजरा करावा.यावेळी मुर्तीची उंची, उत्सवाचे स्वरूप यांसह पारंपरिक विसर्जन करावे.आणि गणेश विसर्जन व्यवस्था या अनुषंगानेही करून आपण कोरोना विषाणूचे सावट असल्याने यंदा सार्वजनिक गणेश उत्सवाच्या स्वरुपावर मर्यादा आहेत. त्यामुळे यंदा उत्सव मंडळांनी मुर्तीची उंची लहान ठेवण्याबाबत विचार करावा.आणि महाराष्ट्रातील सर्व गणेश भक्तांनी गणेश उत्सव आरोग्याची काळजी घेवून गणेशोत्सव साजरा करावा.असे आवाहन भाजपाचे तन्मय गांगुर्डे यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here