सहाव्या महाराष्ट्र राज्य मास्टर गेम्समध्ये राष्ट्रीय खेळाडू अमित विटुळे यांना रौप्यपदक

अमित विटुळे

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) । पिंपरी चिंचवड येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर येथे १३ व १४ डिसेंबर रोजी झालेल्या सहाव्या महाराष्ट्र राज्य मास्टर गेम्स मध्ये नाना काटे सोशल फाउंडेशन अंतर्गत चालणाऱ्या ट्रॅक फॉर्च्यून स्पोर्ट क्लबचे प्रशिक्षक आणि राष्ट्रीय खेळाडू अमित विटुळे यांना या स्पर्धेमध्ये ८०० मीटर धावणे आणि १५०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात दोन रौप्य पदक पटकावले आहे,

अमित विटुळे यांची पुढील महिन्यात नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे तसेच पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक नाना काटे यांनी अमित विटुळे यांचे विशेष अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

अमित विटुळे
पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक नाना काटे यांनी अमित विटुळे यांचे विशेष अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here