पान टपरीवर गोंधळ, कमरेतून पिस्तूल काढून थेट फायरिंग; शहरात दहशत

फायरिंग

जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) । जिल्ह्यातील भुसावळ शहरात काल रात्री पान टपरीवर झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाले. पान टपरीवर गोंधळ घालत असताना एका इसमाने अचानक कमरेतून पिस्तूल काढत हवेत व लक्ष्यावर फायरिंग केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

या गोळीबाराच्या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर नागरिकांनी घाबरून पळ काढला, तर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवर आलेले चार जण पान टपरीवर थांबले होते. तेथे वाद झाल्यानंतर त्यातील एका जणाने कमरेतून पिस्तूल काढून गोळीबार केला आणि सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच भुसावळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे भुसावळ शहरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी संयम राखावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here