जळगाव (प्रतिनिधी) । येथील पत्रकार कॉलनीतील राहिवासी पुष्पा त्र्यंबक चौधरी (वय ७५) यांचे दीर्घ आजाराने शुक्रवार (दि.१९) पहाटे दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा पत्रकार कॉलनी येथील राहत्या घरून सायंकाळी ७.३० वाजता निघणार असून, त्या किरण त्र्यंबक चौधरी, डॉ.रुपाली धांडे यांच्या आई तर शहरातील सुप्रसिध्द दंतचिकीत्सक डॉ.महेंद्र धांडे यांच्या सासू होत.







