२४ तासात सशस्त्र दरोड्याच्या गुन्ह्याचा तपास लावल्याबद्दल पुणे गुन्हे शाखा युनिट ३ च्या कर्मचाऱ्यांचा सन्मान

पुणे

पुणे (उपसंपादक दिनेश खरोटे) । उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घडलेल्या गुन्ह्यांबाबत दोन सराफी दुकानांवर सशस्त्र दरोडा टाकलेल्या आरोपींना २४ तासात जेरबंद केल्याबद्दल पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पुण्यातील सराफ सुवर्णकार रक्षण समितीतर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी मोहन खंदारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संपतराव राऊत पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 3, प्रियंका गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट 3 चे हवालदार किशोर शिंदे , कैलास लीमन , पुरुषोत्तम गुन्ला , योगेश झेंडे , तुषार किद्रे तसेच उत्तम नगर पोलीस ठाण्याचे कुरेवाड, धनवडे, देशमुख, जेजोट, शेलार, पाडळे, अजय पवार, चेतन बराटे या सर्वांचा सराफ सुवर्णकार रक्षण समिती पुणे जिल्हा याचे अध्यक्ष उमेशशेठ बुराडे, विवेकशेठ मिसाळ व इतर मान्यवरांतर्फे उत्तम नगर पोलीस ठाण्यामध्ये सत्कार करण्यात आला.
उत्तम नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका गायकवाड यांनी सर्व समाजातील आलेल्यांना मार्गदर्शन केले व भविष्यात काय काळजी घ्यावी बद्दल महत्वपूर्ण माहिती सांगितली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here