शहादा ( विजय निकम) – जिल्ह्यात यावर्षी कोरोना व्हायरसच्या महामारी मुळे कोणत्याही प्रकारे मिरवणुका न काढता
साध्या पध्दतीने लहानत लहान गणेशाच्या मूर्तीची स्थापना करुन गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोसल डिस्टनचे पालन करुन नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघातील आमदार राजेश पाडवी यांनी श्री गणेशाची मूर्तीची स्थापना तळोदा तालुक्यातील आपल्या राहत्या घरी सोमावल येथे केली.
यावेळी गणपतीची स्थापना आमदार राजेश पाडवी याच्या हस्ते करण्यात आली.गणेशाची महापुजा व आरती करुन आमदार राजेश पाडवी यांनी गणेशा चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्रसह भारत देशातील जनतेसाठी कोरोना व्हायरसच्या महामारी पासुन लवकर मुक्ती मिळावी यासाठी साकडे घातले व गणेशाकडे विनंती करुन जनतेसाठी मागणी केली की माझ्या मतदारसंघासह,नंदुरबार जिल्ह्य़ातील व महाराष्ट्रातील जनतेला सुखसमृध्दीने राहु दे व देशावरील कोरोनाचे महामारीचे संकट लवकर जावुदे व सुखसमृध्दी लाभू दे अशी प्रार्थना देखील करण्यात आली.
यावेळी त्याच्या निवासस्थानी आनंदमयी वातावरण होते.गणेशाची स्थापना करताना कोरोना व्हायरस पासुन सर्व जनतेला लवकर मुक्ती मिळावी यासाठी हजर असलेल्या सर्व गणेशभक्तांनी सामुहिक मागणी देखील केली आहे.








