महाराष्ट्र सायबरची उल्लेखनीय कारवाई सुरूच, ४८० गुन्हे दाखल

सध्या कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर राज्यात,काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर अशा गुन्हेगार व समाजकंटक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी व त्यांना पकडण्यासाठी सर्व आयुक्त व जिल्हा पोलीस प्रशासना बरोबर  समन्वय साधून काम करीत आहे. महाराष्ट्र सायबर या करिता टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे..
महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४८० गुन्ह्यांची (ज्यापैकी ३२ N.C आहेत) नोंद १५ जून २०२० पर्यंत झाली आहे.
या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९५ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १९६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,tiktok विडिओ शेअर प्रकरणी २५ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ९ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ५१ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २५८ आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे .
बीड जिल्ह्यातील परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे ,त्यामुळे जिल्ह्यातील नोंदणीकृत गुन्ह्यांची संख्या ४९ झाली आहे . सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीला जातीयतेचा व धार्मिक रंग देणाऱ्या आशयाचा टिकटॉक व्हिडिओ बनवून तो सोशल मिडियावर प्रसारित केला त्यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता .
सध्याच्या काळात सायबर भामटे लोकांना फसविण्यासाठी अनेक युक्त्यांचा वापर करत असतात त्याचाच एक प्रकार म्हणजे तुम्हाला एक sms येतो कि तुमचे डेबिट कार्ड ब्लॉक झाले आहे व मेसेज मधील नंबरवर कॉल करून तुमची माहिती update करा ,किंवा मेसेज मधील लिंकवर क्लिक करून तुमची माहिती update करा . तुम्ही माहिती दिलीत तर त्याची खात्री करण्यासाठी येणारा otp पण मागितला जातो व तुमच्या खात्यामधील पैसे अनोळखी अकाऊंटमध्ये transfer केले जातात . या सर्व संभाषणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे भामटे कधीही सर्व संभाषणात तुमच्या बँकेचे नाव घेत नाहीत .
महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कि असे मेसेज आले तर सावध राहा . अशा येणाऱ्या sms ने घाबरून त्यात दिलेल्या लिंकवर क्लिक करू नका किंवा फोन करू नका . सर्व नागरिकांनी लक्षात ठेवा कि कुठलीही बँक कोणत्याही खातेदाराची वैयक्तिक माहिती जसे कि CVV क्रमांक ,पिन क्रमांक फोनवर विचारणार नाहीत,तसेच OTP confirmation साठी कॉल करणार नाहीत . जर तुम्हाला असा फोन आला व पलीकडील व्यक्ती त्या संभाषणामध्ये तुमच्या बँकेचे नाव घेत नसेल तर तो फेक कॉल असण्याची शक्यता जास्त आहे .तुम्ही जर एखाद्या अशा प्रकारच्या गुन्ह्यात फसविले गेले असाल तर कृपया न घाबरता त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये करा व www.cybercrime.gov.in या संकेत स्थळावर देखील त्याची नोंद करा .केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र सायबर मुंबई यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here