चोपडा येथे माजी खासदार स्व.हरिभाऊ जावळेंना भाजपा कार्यालयात भावनिक वातावरणात सर्वपक्षीय श्रद्धांजली!

चोपडा | नंदलाल मराठे – रावेर लोकसभेचे माजी खासदार व रावेर यावल मतदार संघाचे माजी आमदार भारतीय जनता पक्षांचे विद्यमान जिल्हाध्यक्ष हरिभाऊ माधवराव जावळे यांचे १६ जून रोजी मुंबई येथे अकाली निधन झाले.स्व.हरिभाऊ जावळें यांना दि.१७ रोजी तालुक्यातील भारतीय जनता पार्टी,भारतीय युवा मोर्चाचे व आघाडीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,व सभासद आणि सर्व पक्षांकडून श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे वतीने माजी पं स सभापती आत्माराम म्हाळके, तालुका अध्यक्ष पंकज पाटील, नगरसेवक तथा शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल, शिवसेना माजी आमदार तथा तापी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन कैलास पाटील,देवेंद्र सोनवणे,मनोहर पाटील,शिवसेना शहर प्रमुख आबा देशमुख,भाजपा राज्यस्तरीय परिषद सदस्य मगन बाविस्कर,विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रदीप पाटील,माजी शहर अध्यक्ष राजुभाऊ शर्मा, जि प सदस्य गजेंद्र सोनवणे, उपाध्यक्ष देवा पाटील, शेतकी संघ संचालक हिम्मत पाटील, राष्ट्रवादी पक्षातर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन नारायण पाटील, जिल्हा सरचिटणीस संजय कानडे, मनसे चे माजी जिल्हा प्रमुख अनिल वानखेडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघ चालक राजेश पाटील, तालुका संघ चालक डॉ. मनोज साळुंखे,शहर संघ चालक मनोज विसावे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष के डी चौधरी,तापी सह.सूतगिरणी संचालिका सौ.रंजना नेवे,श्रीकांत नेवे,भाजपा सरचिटणीस मनोहर बडगुजर,सुनिल सोनगिरे,व्यापारी आघाडी प्रमुख हेमंत जोहरी,उपाध्यक्ष दीपक लोहाणा,प्रसिद्धि प्रमुख यशवंत जडे, कार्यालय मंत्री मोहित भावे,पप्पू सोनार,जीवन पाटील यांनी स्व. हरिभाऊ जावळेंच्या प्रतिमेस हार व पुष्प अर्पण केले.कार्यक्रमास शहरातील व तालुक्यातून स्व. हरिभाऊ जावळे यांच्यावर प्रेम करणारे बरेच नागरिक उपस्थित होते.सदर कार्यक्रमात सहभागी झालेल्यांनी कोरोना नियमावली नुसार सोशल डिस्टन्स चे पालन करून,मास्क व सॅनिटायझरचा वापर करून शासकीय नियम पाळला असे प्रसिद्धी प्रमुख यशवंत जडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here