पारोळा (क्राईम रिपोर्टर अरविंद जाधव) । नुकताच घेण्यात आलेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत पारोळा नगर परिषदेवर सेना भाजप युतीने दणदणीत विजय मिळवत एक हाती सत्ता मिळवली आहे. चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण आणि एरंडोल पारोळा चे आमदार अमोल पाटील यांनी या निवडणुकीत भाजप शिवसेना युतीचे उमेदवार रिंगणात उतरवले होते.
त्यात पारोळा नगराध्यक्ष पदासाठी चंद्रकांत पाटील हे प्रभाग क्रमांक १ मधुन ९४८६ मतानी निवडून आले असून नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले आहे. तसेच अनुष्ठान भाग्यश्री दीपक (शहर विकास आघाडी), बेलदार नजीरखान हमीद अपक्ष प्रभाग क्रमांक २, मराठे पंकज राजेंद्र (शिवसेना), पाटील किरण चंद्रकांत(शिवसेना), प्रभाग क्रमांक ३, टिपरे भूषण प्रकाश (शहर विकास आघाडी), हमीदा बी शेख सलीम (शहर विकास आघाडी) प्रभाग क्रमांक ४, चौधरी मंगलबाई सुदाम (भाजपा), चौधरी अमृत नाना (शिवसेना) प्रभाग क्रमांक ५, वाणी निर्मला अशोक (भाजपा ५), कासार प्रमोद गणपत (अपक्ष), प्रभाग क्रमांक ६, शिरोळे अमोल गोविंद (भाजपा) ६, पाटील सुवर्णा विनोद (भाजपा)
प्रभाग क्रमांक ७, जगदाळे पल्लवी मनोज (शिवसेना) ७, सोनार नितीन दत्तात्रेय (शिवसेना) प्रभाग क्रमांक ८, महाजन अलका धीरज (भाजपा) ८, तांबे मंगेश सुधाकर (भाजपा) प्रभाग क्रमांक ९, शिरोळे वंदना गोविंद ९ (भाजपा), पाटील राजेंद्र हिम्मत (भाजपा) प्रभाग क्रमांक १० अ, मिस्तरी कविता रमेश (शिवसेना)ब, पाटील नरेंद्र नारायण (भाजपा) प्रभाग क्रमांक ११ अ, पवार माधुरी दगडू (भाजपा) ११ ब, पाटील विवेक पतंगराव (शिवसेना) प्रभाग क्रमांक १२ अ, पाटील स्मिता छोटू (भाजपा) १२ब, तसेच पाटील रोहन वसंतराव (भाजपा) हे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. या निवडणुकीत आ. अमोल पाटील यांनी स्वतः परिश्रम घेतले म्हणून भाजप शिवसेना युतीच्या सर्व उमेदवार निवडून आले, या निवडी बद्दल आमदार अमोल चिमणराव पाटील यांनी सर्व विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.







