नाशिक (उपसंपादक इंजि.कुबेर जाधव) । देवळा सटाणा तालुक्यातील रस्त्यांची बिकट अवस्था होते आहे, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व ठेकेदांराचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात प्रचंड रोष निर्माण झाला आहे,
सर्व सामान्य माणसाच्या मूलभूत सोयी-सुविधांकडे होत असलेल्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे तालुक्यात विशेषतः सटाणा शहरातील रस्त्याची दुरवस्था बघितल्यावर जनतेच्या मनात प्रशासनाबद्धल असंतोष वाढत आहे. प्रशासनाने तात्काळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ हा अपुर्ण असलेलं काम तात्त्काळ पूर्ण करुन वाहतूक व्यवस्था सुरक्षित करावी, अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या शहराला मोकळा श्वास घेता येईल का?अशी शंका जोर धरू लागली आहे. मागच्या चार दिवसांपूर्वी देवळा येथील काही तरूणांनांनी उपोषण करत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ चे देवळा शहर पाच कंदिल ते माळवाडी फाटा पर्यंत चे सर्व अतिक्रमण हटविण्याची मागणी करत तिन दिवस पांच कंदिल जवळ बेमुदत उपोषण करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले, देवळा पांचकंदिल परिसर अतिशय गजबजलेला असतो, देवळा शहराची ओळख असलेल्या पाच कंदिल हा ऐतिहासिक वारसा आहे तो सुरक्षित टेवत चारी बाजूंनी योग्य जागा सोडून तिन्हीही मार्गाने राष्ट्रीय महामार्गाचे काम केले पाहिजे, विशेषतः पाच कंदिल च्या पक्ष्चिम बाजूला शासकिय अधिग्रहित जागा उपलब्ध आहे,तीचा योग्य वापर करून रस्त्यांची रुंदी ही २६ मिटर कायम करुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पुरेसा पादचारी मार्ग आवश्यक आहे, त्यासाठी देवळातील राव ग्रुपने केलेलं उपोषण लक्षवेधी ठरले आहे,
हे झाले देवळा शहर व तालुक्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचा विषय, खरी समस्या ही सटाणा शहर व त्याला छेद देवुन जाणाऱ्या महाराष्ट्र आणि गुजरातला जोडल्या जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची आहे,जे देवळा वाले करु शकतात ते सटाण्यात का होऊ शकत नाही? सटाणा शहराचा दक्षिण बाजूस असलेल्या आरम नदी ते शहराच्या उत्तरेस असलेल्या सुकड नदी पर्यंत असलेल्या शहरातुन जात असलेल्या महामार्ग रूंदीकरणा व कामा बाबत कुठल्याही प्रकारची हालचाल होताना दिसत नाही, रेंगाळलेले काम बघता शहरा लगत बायपासचा पर्याय ही असु शकतो, तसं झालं तर योग्यच आहे,मात्र काळ सोकाळतो आहे.सद्या शहरांत प्रचंड प्रमाणात वहातुक कोंडी होत आहे,त्यात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, यशवंतराव महाराजाची यात्रा उत्सवाची सुरुवात झाली आहे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरच्या ठेकेदाराने दिवसांतुन किमान दोन वेळा तरी पाणी मारणे गरजेचे आहे, नाही त्यांनी तर सटाणा नगरपालिकेने तरी नगर पालिका हद्दीतील रस्त्यावर पाणी मारणे आवश्यक आहे, रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत,
यात्रेमुळे लाखो भाविकांची वर्दळ वाढली आहे, यात्रेच्या निमित्याने लाखो रुपयांची कमाई नगर पालिकेला होत असते, पुढे राष्ट्रीय महामार्गिवर असलेल्या ताहराबाद येथील मोसम नदीवरील मोडकळीस आलेल्या पुलाची अवस्था ( तब्येत) दिवसेंदिवस खालावत चालली आहे गेल्या वर्षी तात्पुरती डागडुजी केली परंतु नवीन पुलाचे काम काही केल्या सुरू होत नाही,त्याच घोडं कुठे अडले? ते समजायला मार्ग नाही, राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची मुदत संपत आली तरी शिर्डी सुरत या महामार्गाचे काम ५० % अपुर्णच आहे,
आजच्या घडीला सटाणा शहरातील रस्त्यांची समश्या अतिशय जटिल होत आहे, या बाबतीत प्रशाशनाने वेळीच दखल घेतली पाहिजे, अन्यथा शहरवासियांच्या मोठ्या संतापाला सामोरे जावे लागेल, तसा इशाराही देण्यात आला आहे, भावडबारी घाटाचे फक्त ४० % काम झाले अजुनही ६० % काम अपूर्ण आहे, ते केव्हा पूर्ण होईल या बाबत साशंकता कायम आहे, दिंडोरी व धुळे लोकसभा मतदारसंघाचे दोन्ही ही खासदार हे अतिशय तत्पर आणि संवेदनशील आहेत, त्यांच्या कडे सत्ता नसल्याने काही मर्यादा आहेत,त्या आपण समजू शकतो, परंतु या रस्त्याच्या बाबतीत नक्कीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे लक्षवेधी मांडुन आम जनतेच्या मनातील संभ्रम दूर करु शकतील असा विश्वास वाटतो, लवकरात लवकर सदर रस्ताच काम पूर्ण झाले पाहिजे अशी सर्व सामान्य जनतेची इच्छा आहे, असे समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव यांनी कळविले आहे.







