ठाण्यातील आयबिस हॉटेलवर छापा; चार महिलांची सुटका, महिला दलाल व उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारा पुरुष दलाल अटकेत

आयबिस हॉटेल

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) । सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिनू वर्गीज यांनी बॉलिवूड मॉडेल्सचा समावेश असलेल्या वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. सदर महिला एका तासासाठी ७५ हजार रुपये आकारत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील सर्व महिला अंधेरी लोखंडवाला परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे.

महिला दलालाने रूम बुकिंगसाठी आयबिस हॉटेल, पोखरण रोड क्रमांक 1, ठाणे पश्चिम येथील लोकेशन शेअर केले होते. ही माहिती डीसीपी प्रशांत कदम (झोन–5) यांना देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण माने यांनी पोलीस निरीक्षक विठ्ठल चौघुले यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून हॉटेलवर छापा टाकला.
छाप्यात चार महिलांची सुटका करण्यात आली असून एका महिला दलालासह उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारा असल्याचा आरोप असलेल्या एका पुरुष दलालास अटक करण्यात आली आहे. तसेच मोना मंडल नावाची महिला दलाल फरार असून तिचा शोध सुरू आहे. या प्रकरणात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून ही कारवाई वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. पुढील तपशील लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here