मुंबई (संपादक सुनिल पाटील) । आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थेतर्फे २०२५ च्या दिवाळी अंकासाठी ठाणे नागरिकच्या दिवाळी अंकाला अक्षरआनंद सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार कल्याणमध्ये ६ डिसेंबर रोजी एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारसोहळ्यात ठाणे नागरिकच्या दिवाळी अंकासह सकाळच्या अवतरण, ‘नृत्यवकाश’, ‘पत्रकार दर्पण’, ‘पसायदान’, ‘जॉय’ आणि ‘युवासूत्र’ यांसारख्या इतर अंकांनाही विशेष लक्षवेधी पुरस्कार मिळाले आहेत, या सोहळ्यात ठाणे नागरिकचे संपादक व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ ठाणे शहर जिल्हाचे अध्यक्ष सतिषकुमार भावे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्काराबद्दल ठाणे नागरिक व संपादक सतीशकुमार भावे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.






