नशिराबाद नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय : लोकनियुक्त नगराध्यक्षपदी योगेश पाटील यांचा विजय

नशिराबाद

जळगाव (तालुका क्राइम प्रतिनिधी मनोज नाले) । नुकत्याच पार पडलेल्या नशिराबाद नगर परिषद निवडणुकीचा निकाल आज नशिराबाद होमगार्ड प्रशिक्षण केंद्र येथे जाहीर झाला . या निवडणुकीत महायुतीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगेश नारायण पाटील यांनी विजय मिळवला आहे.

नगर परिषदेच्या सदस्य निवडणुकीत महायुतीने स्पष्ट आघाडी घेतली असून महायुतीच्या उमेदवारांनी सर्वाधिक १३ जागांवर विजय मिळवला आहे. तसेच महायुती पुरस्कृत 1 उमेदवाराचाही विजय झाल्याने महायुतीकडे एकूण १४ जागांचे संख्याबळ असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. अपक्ष उमेदवारांनी दोन जागांवर विजय मिळवला असून एमआयएम पक्षाचे उमेदवारही दोन जागांवर विजयी झाले आहेत. या निकालामुळे नशिराबादच्या नगर परिषदेवर महायुतीचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून आगामी काळात शहराच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here