नाशिक (उपसंपादक इंजि.कुबेर जाधव) । आपला मावळा संघटना आणि लोकनेते खासदार डॉ. निलेशजी लंके यांच्या नेतृत्वाखाली शिवकालीन गडकोटांची स्वच्छता, संवर्धन, पर्यावरण रक्षण आणि इतिहास जतनासाठी एक सशक्त मोहीम आयोजित करण्यात आली आहे. कसमादेच्या शिवप्रेमी मावळ्यांनी या मोहीमेत सहभागी होवून ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन कुबेर जाधव यांनी केले आहे.
रविवार, २८ डिसेंबर २०२५ सकाळी ७’वाजता किल्ले साल्हेर, ता. बागलाण (सटाणा), जि. नाशिक येथे ही मोहीम आयोजित करण्यात आली असून, सहभागी होणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवकांसाठी रात्रीचे जेवण, सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण उपलब्ध असेल. २७ डिसेंबर रोजी त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अहिल्यानगर व पारनेर शहरातून बसची सोय उपलब्ध असून २७ डिसेंबर रोजी बस व दुपारी ४ वाजता निघेल. नोंदणीकृत व पूर्वसूचित स्वयंसेवकांनाच बसमध्ये प्रवेश मिळेल. मुक्कामी येताना ब्लँकेट/चादर सोबत आणावी, टी-शर्ट मिळालेल्यांनी तो परिधान करून यावे; इतरांसाठी अल्पदरात टी-शर्ट उपलब्ध असून, या मोहीमेसाठी खासदार डॉ. निलेश लंके येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.







