ढवळपुरीतील दुर्गादेवी विद्यालयात विद्यार्थ्यांना थंडीपासून दिलासा; ब्लॅंकेट वाटप

ढवळपुरी

पारनेर (तालुका प्रतिनिधी सुनील धोंडीभाऊ लोणकर) । तालुक्यातील ढवळपुरी येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या श्री दुर्गादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाशी संलग्न श्री फकीरबाबा विद्यार्थी वस्तीगृहात मंगल भक्त सेवा मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षणासाठी ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य आदम शेख, पर्यवेक्षक बाळासाहेब निवडुंगे, मंगल भक्त सेवा मंडळाचे सेवेकरी कीर्तीकुमार कोठारी, समाजसेवक बंडू नाना सप्रे, संतोष व्यवहारे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वितरित करण्यात आले.
सद्गुरू श्री शंकर दत्त महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तसेच श्री विश्वेश्वर स्वामी महाराज राजाभाऊ कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगल भक्त सेवा मंडळ ट्रस्ट, एमआयडीसी अहिल्यानगर यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. मंडळाकडून दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन, दप्तर, इंग्लिश डिक्शनरी तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात येते.
यावेळी प्राचार्य आदम शेख यांनी मंडळाच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. पर्यवेक्षक बाळासाहेब निवडुंगे यांनी धार्मिक कार्यासोबतच समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल मंगल भक्त सेवा मंडळाचे आभार मानले. संतोष व्यवहारे यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाला राहुल झावरे, सहादू भोंडवे, भगवान राऊत, अमोल ठाणगे, सुभाष अडसूळ, सुरेश नवले, तुकाराम हराळ, अरविंद कुमावत, संदीप खिलारी, सुरज थोरात, डोळस सर, यमाजी झेंडे, शब्बीर शेख, राम चौरे, वर्षा शेळके, हर्षा जायभाये, निशा भोंडवे, जयश्री भोंडवे, वसतिगृह अधीक्षक सुधाकर सुळे, विश्वनाथ चौधरी, फारूक शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय दळवी यांनी केले तर आभार अजित सांगळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here