जळगाव शहरात सर्वाधिक १०१ तर ५ कोरोनाबाधितांचा मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आज (दि.२२) जिल्ह्यात नव्याने ६१६ कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या २१ हजार ७१३ झाली आहे. सर्वाधिक १०१ कोरोबाधित जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 5 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर दिवसभरात ४०२ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
शनिवारी आढळलेल्या ६१६ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर १०१, जळगाव ग्रामीण ३४, भुसावळ ३०, अमळनेर ४२, चोपडा ८६, पाचोरा ३६, भडगाव ३९, धरणगाव २८, यावल १४, एरंडोल ९, जामनेर ३६, रावेर ३०, पारोळा ५२, चाळीसगाव ६५, मुक्ताईनगर १, बोदवड ११, इतर जिल्ह्यातील २ असा समावेश आहे. दिवसभरात ५ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान बळी गेला असून यात जळगाव शहर २ तर चोपडा, बोदवड आणि रावेर तालुक्यातील प्रत्येकी १ असा समावेश असल्याची, माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.







