राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त मंगळवेढा तहसीलदार कार्यालयात विशेष कार्यक्रम

राष्ट्रीय ग्राहक

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी राहुल मस्के) । आज राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त मंगळवेढा तहसीलदार कार्यालयात आयोजित केलेला कार्यक्रम अत्यंत यशस्वी, प्रेरणादायी व उपयुक्त ठरला. या कार्यक्रमास आदरणीय तहसीलदार मदन जाधव यांच्या मार्गदर्शनाने नायब तहसीलदार शिरीष कुमार शहापुरे निवासी, पुरवठा अधिकारी जयंत कुलकर्णी तसेच विविध विभागांचे मान्यवर अधिकारी अर्जुन गुरव विनोद पवार लिपिक तहसील कार्यालय मंगळवेढा पुरवठा शाखा तसेच रेशन दुकानदार लक्ष्मी दहिवडी श्रीमसरे शरद नगरचे अनिल माळी देगावचे गणेश ढेकळे हे उपस्थित होते.

या कार्यक्रमात नॅशनल कंझ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहून ग्राहक हक्क व जागृतीसाठी एकजुटीने कार्य करत असल्याचे सुंदर चित्र दिसून आले. विशेषतः ग्राहक संघटनेचे संस्थापक संजय पाठक यांच्या नेतृत्वाखाली ग्राहक संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सौ. अलका राहुल मस्के ग्राहक संघटनेच्या तालुकाध्यक्ष संगीता रजपूत यांची उपस्थिती कार्यक्रमास अधिक बळ देणारी ठरली.
ग्राहकांच्या हक्कांबाबत जागृती निर्माण करणे, त्यांना न्याय मिळवून देणे व समाजात कायदेशीर जाणीव वाढवणे, या उद्देशाने आपण सर्वजण एकत्र येऊन कार्य करत आहोत, हे आजच्या कार्यक्रमातून ठळकपणे दिसून आले. या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व आयोजक, अधिकारी वर्ग व पदाधिकाऱ्यांचे नॅशनल कंझ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनतर्फे आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here