शिवसेना मनसे युतीच पंढरीत स्वागत; युती अखंड राहाण्यासाठी विठ्ठलाला घातले साकडे

शिवसेना मनसे

पंढरपूर (प्रतिनिधी प्रकाश इंगोले) । उध्दव ठाकरे व राज ठाकरे यांनी आज मुंबईत शिवसेना मनसे युतीची घोषणा केली पंढरीत ही बातमी समजताच उपजिल्हाप्रमुख काकासाहेब बुराडे.. जेष्ठ शिवसैनिक बाळासाहेब रणदिवे शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर उपशहरप्रमुख गजानन टल्लू नितीन थिटे बाळासाहेब देवकर भैय्या पवार आदींनी जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे तालुका प्रमुख बंडू घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव पायरी येथे ऐकमेकास पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केला

सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रथम श्री विठ्ठल रखुमाई चे दर्शन करुन मराठी माणसासाठी ही युती अभेद्य व कायम चिरंतर तेवत राहो आशी प्रार्थना केली. यावेळी बोलताना उपजिल्हाप्रमुख काकासाहेब बुराडे म्हणाले आपण बाबुराव वडणे जिल्हाप्रमुख असल्या पासून शिवसेना पक्षाच काम करतोय परंतु २००४ सालचा तो काळा दिवस आज हि आठवला तरी अंगावर काटा उभा राहतो ठाकरे कुटुंबीय फुटीच्या मार्गावरुन गेले राजसाहेबांनी सवतासुभा मांडुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. हा धक्का शिवसैनिक विसरू शकत नाही
ते पुढे म्हणाले की, हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व तमाम शिवसैनिकांना या फुटीच्या तीव्र वेदना झाल्या. यातूनच शिवसैनिकांच मोठ नुकसान झाले. राज व उद्धव साहेब एकत्र यावेत यासाठी भरपूर प्रयत्न झाले परंतु यश येत नव्हते. आज वीस वर्षानंतर दुभंगलेली मने एक झाली आजचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल आणि आजचा हा दिवस पाहाण्यासाठी बाळासाहेब हवे होते. शिवसेना मनसे युतीचे शिवसैनिक व मनसैनिकांनी स्वागत केले असून, मराठी माणसाचे न्याय हक्कासाठी ही युती गरजेची होती या युतीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. यावेळी शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर बाळासाहेब रणदिवे आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here