शिंदखेडा तालुक्यात कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार मामा-भाचा ठार

accident
file photo

धुळे (उपसंपादक प्रशांत सूर्यवंशी) । भरधाव जाणाऱ्या कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार झाल्याची घटना मुंबई- आग्रा महामार्गावरील बाभळे फाट्याजवळ घडली. मृतांमध्ये मामा व भाच्यांचा समावेश असून ते शिंदखेडा तालुक्यातील रहिवासी आहेत.

शिंदखेड्यातील पिंप्राळ येथील सुनील साहेबराव बेहरे (३५) हे भाचा चेतन पंकज देसले (२१, रा. भडणे) याच्यासह दुचाकीवरून (एमएच १८ बीडब्ल्यू २४२०) एमआयडीसीत कामाला जात होते. बाभळे फाट्याजवळ कंटेनरने (डीएन ०९ आर ९८६७) त्यांच्या दुचाकीस धडक दिली. यात दोघाही जागीच ठार झाले. अपघातानंतर कंटेनर चालक चंद्रभान प्रजापती ( रा. चेंबूर, मुंबई) हा शिंदखेडा पोलिस ठाण्यात हजर झाला. याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here