सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित विशेष कार्यक्रम

ऑनलाइन श्री गणेश अथर्वशीर्ष पठण आणि नामसाधना या कार्यक्रमाचा सर्व गणेशभक्तांनी लाभ घ्यावा ! – प्रशांत जुवेकर, हिंदू जनजागृती समिती, जळगाव
जळगांव (संपादक सुनिल पाटील) – गणेशोत्सव काळात 1 सहस्त्र पटीने पृथ्वीवर येणाऱ्या गणेशतत्वाचा लाभ करून घेण्यासाठी या काळात गणरायाची भावपूर्ण उपासना करणे आवश्यक आहे. गणेश उपासनेत श्री गणेश अथर्वशीर्ष आणि श्री गणेश नामजप याना विशेष स्थान आहे. यासाठीच सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती यांनी विशेष ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन गणेशोत्सव काळात केले आहे. श्री गणेश अथर्वशीर्ष पठण आणि नामसाधना असे या ऑनलाइन कार्यक्रमाचे नाव आहे.
प्रतिदिन सायंकाळी 6.30 ते 7 या वेळेत प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यात अथर्वशीर्षाचे पठणासोबतच गणेशाचा नामजप ही असणार आहे तसेच प्रतिदिन गणेश उपासनेविषयी महत्वाची माहितीही गणेशभक्तांना मिळणार आहे. तरी सर्व गणेशभक्तांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आणि भावपूर्ण गणेश उपासना करून गणरायाची कृपा संपादन करून घ्यावी, असे आवाहन समितीच्या वतीने श्री. जुवेकर यांनी केले.
कार्यक्रम पुढील लिंकवर पाहता येईल –
Facebook live : https://www.facebook.com/HJSJalgaon/

???? Youtube Live :

https://www.youtube.com/HJSJalgaon

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here