श्रीनाथ विद्यालयात आंतरशालेय क्रीडा स्पर्धा संपन्न

क्रीडा स्पर्धा

पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) । शुक्रवारी (दि.१९) श्रीनाथ विद्यालयात नुकत्याच आंतरशालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक महेश इंगोले यांचे हस्ते करण्यात आले.

स्पर्धांमध्ये धावणे, लांब उडी, उंच उडी, कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, संगीत खुर्ची, लिंबू चमचा, 400 मीटर रिले व विविध मैदानी खेळांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी खेळाडूवृत्ती, शिस्त आणि संघभावना यांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली.
स्पर्धांच्या समारोपप्रसंगी विजेत्या संघांना व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी बोलताना मुख्याध्यापकांनी क्रीडेमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, तसेच आरोग्य व आत्मविश्वास वाढीस लागतो, असे मत व्यक्त केले.
या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षक बाबर बी.पी, बी.जी कुलकर्णी, व्ही.आर दुधाळ यांनी विशेष परिश्रम घेतले. आंतरशालेय क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण होऊन उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here