शास्त्रीय नृत्याच्या गौरवशाली वारशावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

शास्त्रीय नृत्या

जळगांव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील कला आणि मानव्यविद्या प्रशाळेतर्फे “शास्त्रीय नृत्याचा गौरवशाली वारसा” या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद ७ जानेवारी २०२६ रोजी विद्यापीठात संपन्न होणार आहे.

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच अशा स्वरूपाची प्रतिष्ठित परिषद आयोजित होत असल्याने परिसरातील कला प्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या राष्ट्रीय परिषदेत देश-विदेशातील ख्यातनाम नृत्यतज्ञ उपस्थिती राहणार असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय नृत्याच्या विविध पैलूंवर सखोल सत्रे आणि सादरीकरणे आयोजित करण्यात आली आहेत. प्रा. संध्या पुरेचा, अध्यक्ष, संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली (भरतनाट्यम), डॉ. स्वाती दैठणकर, भरतनाट्यम प्रवर्तक व संशोधक, पुणे (नृत्य योग), प्रीतिलेखा डी. चौधरी, शिलाँग, मेघालय (सत्रिय नृत्य), मुरली मोहन कालवाकालवा, बँकॉक, थायलंड (कथ्थक नृत्य), प्रा. डॉ. जयंत शेवतेकर, विभाग प्रमुख, नाटक-संगीत-नृत्य-योगशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर हे सर्व तज्ञ शास्त्रीय नृत्याचा इतिहास, परंपरा, विविध शैली, संशोधन, तांत्रिक पैलू तसेच आधुनिक नृत्यप्रवाह यावर मार्गदर्शन करणार असून सहभागींना प्रत्यक्ष नृत्यसादरीकरणांचा अनुभव देखील मिळणार आहे.
ही राष्ट्रीय परिषद सर्व नागरिकांसाठी खुली ठेवण्यात आली असून शास्त्रीय नृत्याची आवड असलेल्या रसिकांसाठी, कला अभ्यासकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी एक अद्वितीय संधी ठरणार आहे. परिषदेसाठी नोंदणीची सुरुवात झाली असून इच्छुकांनी
https://forms.easebuzz.in/register/FAOcZgp8/National_Classical_Dance_Conference_Date_07_01_2026 या लिंकवर ऑनलाईन नोंदणी करावी तसेच संशोधक विद्यार्थी नोंदणी करून आपली शोधनिबंध [email protected] ईमेलवर 15 डिसेंबर पर्यंत पाठवू शकतात. अधिक माहितीसाठी सौ. नेहा जोशी 9423978208, डॉ. सुचित्रा लोंढे 9892906374, प्रा.डॉ.राम भावसार 9518586323 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here