भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) । संभाजी ब्रिगेड जामनेर तालुकाध्यक्षपदी शिवश्री गोपाल पाटील (तोंडापुर) यांची आज पुन्हा एकदा बिनविरोध/एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीमुळे तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
गोपाल पाटील यांनी आपल्या मागील कार्यकाळात समाजहिताची अनेक उपक्रमशील व दिशादर्शक कामे केली असून सर्वसामान्य समाजबांधवांमध्ये त्यांना मोठा विश्वास व आदर प्राप्त झाला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे.
या निवडीबद्दल मराठा सेवा संघ जामनेर परिवाराच्या वतीने शिवश्री गोपाल भाऊ पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. येणाऱ्या कार्यकाळात त्यांच्या नेतृत्वाखाली समाजहिताची, युवक प्रबोधनाची व संघटन बळकटीकरणाची कामे अधिक जोमाने घडोत, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.







