भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) । मराठा सेवा संघ जळगाव जिल्ह्याची महत्त्वपूर्ण सभा आज भुसावळ येथे उत्साहात पार पडली. या सभेत जिजाऊ जन्मोत्सव निमित्त १२ जानेवारी २०२६ रोजी सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) येथे आयोजित कार्यक्रमास जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले. तसेच शिवधर्म दिनदर्शिका व मराठा सेवा संघ सदस्य नोंदणी अभियानाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या वेळी मराठा सेवा संघ भुसावळ तालुकाध्यक्षपदी राहुल नारायण पाटील यांची निवड करण्यात आली, तर विष्णू बुगले यांची भुसावळ शहर अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. याच सभेत भुसावळ तालुका कार्यकारणीही घोषित करण्यात आली.
सभेस विभागीय कार्याध्यक्ष सुमित पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल पाटील, जळगाव महानगर अध्यक्ष खुशाल चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, शिवमती योगी गुंजाळ, ज्ञानेश्वर आमले, जामनेर तालुकाध्यक्ष दीपक धोनी, सुजित शिंदे, सटाले सर, बी. आर. पाटील सर, बी. डी. पाटील, धनराज पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विजय देवरे, पितांबर पाटील, राजेंद्र पाटील, अनंत वाघ, अतुल पाटील, गोपाळ पाटील, वसंत पाटील, राजेश पवार, नीलेश शिंदे, भरत पाटील, विशाल तांगडे, माजी सरपंच अशोक निकम, भिका पाटील, सुनील पाटील, नितीन वराडे, शैलेंद्र ठाकरे, रवींद्र पाटील, टी. एम. करंकाळ, ए. ए. बोरसे, शरद पाटील, अविनाश पाटील, योगेश क्षीरसागर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर आमले व खुशाल चव्हाण यांनी मानले.







